आनंदमार्ग
लेखन - श्री. एच. बी. पुरी
आनंद हा सर्वव्यापी आहे. ...
उगाचच जगायचे आहे म्हणून जगण्यात काय अर्थ आहे? स्वतःसाठी जगत असताना दुसऱ्यासाठी जगण्याची संधी शोधत रहा. लहानांत लहान बनून खेळण्यात आनंद आहे, कळीचे फुलात रुपांतर बघण्यात आनंद आहे, मित्रासोबत गप्पा मारण्यात आनंद आहे, वृद्धांना मदत करण्यात आनंद आहे, दीन दुबळ्या गरीब भुकेलेल्यास अन्नदान करण्यात आनंद आहे, परिवार, कुटुंबाची काळजी घेण्यात आनंद आहे, निस्वार्थ प्रेम करण्यात आनंद आहे.
सुख दुख, यश अपयश , जास्त श्रीमंत बनण्याचा हव्यास , या सगळ्यांचा विचार करण्यापेक्षा सकारात्मक दृष्टिकोन ठेवून काम करण्यात आनंद आहे. दुसऱ्याची अवहेलना करण्यापेक्षा स्वताला आरशात बघण्यात आनंद आहे. काम, क्रोध, लोभ,मद मत्सर, द्वेष या षडरिपुंचा त्याग करण्यात आनंद आहे.
निखळ आनंद , सुख, समाधान , शांतता हवी असेल तर ती आपणच आपल्या आयुष्यात आणू शकतो. आनंदाच्या डोहात आनंदाचेच तरंग निर्माण होतात. म्हणूनच आनंद हा सर्वव्यापी आहे. शोधा म्हणजे सापडेल. नाही का? ???
धन्यवाद !
No comments:
Post a Comment