Wednesday, 9 December 2015

चारित्र्य

चारित्र्याचा विकास हेच खरे शिक्षण..

दृष्टी तशी सृष्टी

आनंदमार्गाच्या सर्व वाचकांना समर्पित

Thursday, 26 November 2015

Good morning

🔷सुविचार - 🔷
जीवनात अनंत अडचणी असतात,
पण ओठांवर हास्य ठेवा,
कारण कोणत्याही परिस्थितीत जगायचं तर असतंच.
मग हसत हसत जगण्यात काय नुकसान आहे...

- सुप्रभात💐💐💐💐

Sunday, 8 November 2015

आली दिवाळी. .........

मी व माझ्या कुटुंबियांच्या वतीने आपणा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा...💐
रांगोळीच्या सप्तरंगात सुखाचे दिप उजळू दे,
लक्ष्मीच्या....या पावलांनी घर सुख समॄध्दीने भरू दे.
दीपावलीच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्न साकार व्हावी,
ही दिवाळी आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं,
धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, आरोग्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी, विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी..!
या दिपावलीत या अष्टलक्ष्मी तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत… 💐

दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा... 💐💐

• ˚ •˛•˚ * 。 • ˚ ˚ ˛ ˚ ˛ •
• ˚Happy★* 。 • ˚ ˚ ˛ ˚ ˛ •
•。★diwali!★ 。* • ˚。
° 。 ° ˛˚˛ * _Π_____*。*˚
˚ ˛ •˛•˚ */______/~\。˚ ˚ ˛
˚ ˛ •˛• ˚ | 田田 |門| ˚

Tuesday, 3 November 2015

परिस्थिती व समस्या

नजरिया

सोच बदलो, नजारे बदलेंगे

नमस्कार! मित्रांनो शुभ सकाळ
मानवी मनाला प्रेरणा देण्यासाठी आनंदमार्गाच्या आजच्या दिवसाच्या मंगलमय शुभेच्छा.

पत्र. ..

|| एका वडिलांचं मुलाला पत्र ||
बघ, वाच, ठरव !
 
माझ्या लाडक्या मुला.
मी हे असं तुला पत्र लिहितोय, त्याची कारणं तीन.
1) जगणं, नशीब आणि अपघात या तीन गोष्टी कधी घडतील-बिघडतील सांगता येत नाही. आपण अमुक इतके दिवस जगू हे कुणी सांगू नाही शकत. त्यामुळे काही गोष्टी वेळेवर बोललेल्या ब-या.
2) मी बाप आहे तुझा, मी तुला जे सांगेन ते इतर कुणी कदाचित कधीच नाही सांगणार.
3) मी माझ्या आयुष्यात ज्या चुका केल्या त्या तुला टाळता आल्या तर तुझे कष्ट, जिवाचे चटके आणि मनाचा त्रास बराच कमी होईल, म्हणून काही गोष्टी तुला सांगतोय.
वाचून ठरव, जमल्यास लक्षात ठेव, आयुष्यभर!
 
* माणसांविषयी मनात आकस ठेवू नको, कुणाचा द्वेष करू नकोस. तुझ्याशी कायम चांगलंच वागलं पाहिजे अशी इतर लोकांवर काही आपण सक्ती नाही करू शकत. त्यामुळे ते असंच का वागतात असं म्हणून तणतणू नको. तुझ्याशी कायम चांगलं वागण्याची जबाबदारी फक्त माझी आणि तुझ्या आईचीच आहे. 
तेव्हा जी माणसं तुझ्याशी चांगलं वागतात, त्यांच्याशी चांगलं वाग. पण हे कायम लक्षात ठेव की प्रत्येक माणूस प्रत्येक गोष्ट कुठल्या ना कुठल्या हेतूपोटी करतो. त्यामुळे जी माणसं गोड बोलतात, तुझ्याशी कायम चांगलीच वागतात त्यांना तू खरंच आवडतो असं काही नसेलही. जरा माणसं तपासून बघ, पटकन मित्र बनवून पूर्ण विश्वास टाकण्याची घाई करू नकोस.
 
* जगणं कशानंच कुणामुळेच थांबत नाही. त्यामुळे माणसं तुला सोडून जातील. नाकारतील, झिडकारतील किंवा ज्यांच्यावर तू जीव तोडून प्रेम केलंस तेच तुझ्या आयुष्यातून निघून जातील. तेव्हा हेच कायम लक्षात ठेव की, कुठल्याही माणसामुळे आपलं जगणं थांबत नाही. कधीच नाही.
 
* आयुष्य फार छोटं आहे. आणि तीच तुझी खरी पुंजी आहे. त्यामुळे आज वाया घालवलास तर उद्या कदाचित जगणंच तुला सोडून जाईल. त्यापेक्षा आज मनापासून, भरभरून जग. आनंदी राहा.
 
* प्रेम ही एक क्षणिक आणि चंचल भावना आहे. ती काळाप्रमाणे आणि मूडप्रमाणोही बदलते. ज्यांच्यावर तू जिवापाड प्रेम करतोस तेच समजा तुला सोडून गेले तर जरा धीर धर. काळाच्या मलमानं या जखमाही भरून निघतील. प्रेमात पडलास म्हणजे तेच सगळ्यात सुंदर आणि अतीव चांगलं असं समजू नकोस आणि प्रेमभंग झाला म्हणून त्या दु:खालाही जास्त कवटाळून बसू नकोस.
 
* अनेक यशस्वी माणसांनी शिक्षण अर्धवट सोडलं, तरी ते यशस्वी झाले अशा कहाण्या तू वाचल्या असशीलच! पण याचा अर्थ असा नाही की, एक शिक्षण सोडलं की तूही यशस्वी होशील. नॉलेज, ज्ञान हे एक शस्त्र आहे हे लक्षात ठेव. शून्यातून स्वर्ग निर्माण करता येतो हे खरंय, पण कुठल्या तरी शून्यापासून आधी सुरुवात तर करायला लागतेच ना!
 
*  माझी अपेक्षाच नाही की मी म्हातारा झाल्यावर तू मला सांभाळावंसं. मीही तुला जन्मभर पोसणार नाहीच. तू स्वत:च्या पायावर उभा राहू शकशील तोर्पयत तुला सपोर्ट करणं ही माझी जबाबदारी. त्यानंतर तुला बसमधून फिरायचं की लिमोझीनमधून, गरीबच राहायचं की श्रीमंत व्हायचं हा निर्णय तुझा तू घ्यायचास.
 
* आणखी एक, मीही अनेकदा लॉटरीचं तिकीट काढलं, ते कधीच लागलं नाही. एका रात्रीत श्रीमंत होता येत नाही. श्रीमंत व्हायचं तर मेहनत करावीच लागते. जगात फुकट कधीच काहीच मिळत नाही.
  तुझा लाडका बाबा 🙏🙏
 

निस्वार्थ प्रेम ... कथा

नारायण मुर्ती यांनी
लिहिलेल्या कथेचे भाषांतर...

कथा खूप ह्रुदयस्पर्शी आहे
जरुर वाचा...!
.
माझी पत्नी आतून ओरडली,
"आता किती वेळ तो पेपर
वाचत बसणार आहात...?
आता ठेवा तो पेपर आणि
तुमच्या लाडक्या लेकीला
खायला दिलय ते
संपवायला सांगा...!"
.
मामला गंभीर
वळण घेणार
असे दिसलं..!
मी पेपर बाजुला सारला
आणि घटनास्थळी
दाखल झालो...
.
सिंधू,
माझी एकुलती एक
लाडाची लेक रडवेली
झालेली होती.
डोळे पाण्याने
काठोकाठ भरलेले.
.
तिच्या पुढे एक दहिभाताने
पूर्ण भरलेला बाऊल होता.
सिंधू, तिच्या वयाच्या मानाने
शांत व समजुतदार, गोड
आणि हुशार मुलगी होती.
.
मी बाऊल उचलला
आणि म्हणालो,
"बाळ, तू चार घास खाशील का..?
तुझ्या बाबा साठी...?"
.
सिंधू,
माझी बाळी; थोड़ी नरमली;
पालथ्या मुठीने डोळे पुसले.
आणि म्हणाली,
"चार घासच नाही,
मी सगळ संपविन."
थोडी घुटमळली
आणि म्हणाली,
"बाबा,
मी हे सगळ संपवल तर...
तुम्ही मला मी मागीन
ते द्याल..?"
.
" नक्की...!"
तीने पुढे केलेल्या
गुलाबी हातात मी हात दिला
आणि वचन पक्के केले.
.
पण आता मी थोडा गंभीर झालो.
"बाळ, पण तू कंप्यूटर किंवा
दुसर एखाद महागड खेळण
मागशील तर आता बाबाकडे
तेवढे पैसे नाहीयेत बेटा...!"
.
"नाही बाबा..! मला तस
काही नको आहे...!"
तिने मोठ्या मुश्किलीने
तो दहीभात संपवला...
.
मला माझ्या पत्नीचा आणि
आईचा खूप राग आला.
एवढ्या छोट्या मुलीला
कुणी एवढ खायला देतात...?
ते पण तिला न आवडणार.
.
पण मी गप्प बसलो.
सगळ मोठ्या कष्टाने खाऊन
संपविल्यावर हात धुऊन
सिंधू माझ्यापाशी आली...
.
डोळे अपेक्षेने मोठे करून.
आमच्या सगळ्यांच्या
नजरा तिच्याकडे होत्या.
"बाबा, मी या रविवारी सगळे
केस काढून टाकणार...!"
तिची ही मागणी होती...
.
"हा काय मुर्खपणा चाललाय...?
काय वेड बीड लागलय काय...?
मुलीचे मुंडण...? अशक्य...!"
.
सौ चा आवाज वाढत
चालला होता...!
"आपल्या सगळ्या
खानदानात आसल काही
कुणी केल नाही...!"
आईने खडसावले.
"ती सारखी टिव्ही पहात असते...!
त्या टिव्हीमुळे आपली संस्कृती
आणि संस्कार वाया चालले आहेत...!"
.
"बेटा, तू दुसर काही
का मागत नाहीस...?
या तुझ्या कृत्यामुळे
आम्ही सगळे दु:खी होऊ...!
तुला आम्हाला बघवेल का सांग...?"
.
"सिंधू, बेटा आमचाही विचार कर...!"
मी विनवणीच्या स्वरात म्हटले...
.
"बाबा, तुम्ही पाहिलत ना
मला तो दहीभात संपवणं
किती जड जात होत ते...!"
.
आता ती रडायच्या बेतात होती.
"आणि तुम्ही मला त्याबदल्यात
मी मागीन ते द्यायचं
कबूल केल होतं...!
आता तुम्ही मागे हटता आहात.
मला कोणत्याही परिस्थितीत
दिलेल वचन पाळणा-या
राजा हरिश्चंद्राची गोष्ट
तुम्हीच सांगितली होती ना...?
.
आपण दिलेली वचने
आपण पाळलीच पाहिजेत...!"
मला आता ठाम पणा
दाखवणे भाग होते...
.
"काय डोके-बिके फिरलेय काय..?"
आई आणि सौ. एकसुरात...
.
आता जर मी दिलेला
शब्द पाळला नाही.
तर सिंधू पण दिलेला
शब्द तिच्या पुढल्या
आयुष्यात पाळणार नाही.
.
मी ठरविले,
तिची मागणी पूरी केली जाईल...
.
गुळगुळीत टक्कल केलेल्या
सिंधूचा चेहरा गोल असल्याने
आता तिचे डोळे खूप मोठे
आणि सुंदर दिसत होते...
.
सोमवारी सकाळी मी तीला
शाळेत सोडायला गेलो.
मुंडण केलेली सिंधू
शाळेत जाताना बघणे
एक विलक्षण दृष्य होत.
ती मागे वळली आणि
टाटा केला मी ही
हसून टाटा केला...
.
तेंव्हाच एक मुलगा
कार मधून उतरला आणि
त्याने तिला हाक मारली,
"सिंधू माझ्यासाठी थांब."
.
गंमत म्हणजे त्याचे ही
टक्कल केलेले होते.
अच्छा, हे असं आहे तर
मी मनात म्हणालो...
.
त्या कार मधून
एक बाई उतरल्या आणि
माझ्या पाशी आल्या..!
"तुमची सिंधू किती
गोड मुलगी आहे.
तिच्यासोबत जातोय
तो माझा मुलगा,
हेमंत  नाव त्याचे.
त्याला ल्यूकेमिया
(Blood cancer) झालाय.

.
येणारा हुंदका त्यानी
आवंढा गिळून दाबला
आणि पुढे म्हणाल्या,
.
"गेला पूर्ण महीना
तो शाळेत आला नाही.
केमोथेरपि चालु होती.
त्यामुळे त्याचे सगळे
केस गळाले.
तो नंतर शाळेत यायला
तयारच नव्हता.
कारण मुद्दाम नाही तरी
सहाजिकच मुले चिडवणार...
.
सिंधू मागच्याच आठवड्यात
त्याला भेटायला आली होती.
तिने त्याला तयार केले की
चिडवणा-यांचे मी पाहून घेइन
पण तू शाळा नकोस बुडवू...
.
मी कल्पनाही केली नव्हती
की ती माझ्या मुलासाठी
आपले इतके सुंदर केस
गमवायला तयार होईल...
.
तुम्ही तिचे आईवडील
किती भाग्यवान आहात.
अशी निस्वार्थी आणि निरागस
मुलगी तुम्हाला लाभली आहे..."
.
ऐकून मी स्तब्ध झालो.
माझ्या डोळ्यातून
अश्रू ओघळले.
मी मनाशी म्हणत होतो...
माझी छोटीशी परी
मलाच शिकवते आहे.
खर निस्वार्थ प्रेम
म्हणजे काय ते...
.
या पृथ्वी वर ते सुखी नव्हेत
जे स्वत:ची मनमानी करतात
सुखी तेच की जे दुस-यावर
जिवापाड प्रेम करतात आणि
त्यांच्यासाठी स्वत:ला
बदलायलाही तयार होतात...
.
आपल्यालाही आपलं आयुष्य
सिंधू सारख बदलता यायला पाहिजे...

😊😊😊😊😊😊😊😊

Monday, 2 November 2015

कर्म से होती है पहचान

नमस्कार! मित्रांनो
शुभ सकाळ
आनंदमार्गाच्या सर्व वाचकांना नवीन  दिवसाच्या शुभेच्छा.

वर्तमानात जगा

नमस्कार!
शांततेचा संदेश देणाऱ्या तथागत गौतम बुद्धांना शतशः प्रणाम

Thursday, 29 October 2015

मॅरॅथाॅन

लहानपणी एका रुपयाच्या पतंगाच्या मागे कित्येक किलोमीटर पळायचो,
कितीतरी ठेचा लागायच्या, जखमाही व्हायच्या ती पतंगसुद्धा आम्हाला वेड्यासारख पळवायची, आज कळतंय ती पतंग नव्हती ते एक आव्हान होतं.
आनंदासाठी पळावं तर लागतच कारण तो दुकानात विकत नाही मिळत.
कदाचित हीच आयुष्याची खरी  मॅरॅथॉन आहे
💐.💐
शुभ प्रभात
🌞🌞🌞🌞
आपला दिवस आनंदी जावो
🌹🌹🌹🌹

Wednesday, 28 October 2015

जीवनचक्र

नमस्कार! मित्रांनो शुभ सकाळ
मंगलमय दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आजचा सुविचार

"जशी दृष्टी तशी सृष्टी "
   एखाद्या व्यक्तीविषयी आपल्या मनात जसा पुर्वगृह असतो( चांगला अथवा वाईट) तशीच ती व्यक्ती असते असेच आपण ठामपणे ठरवून टाकतो. भलेही ती व्यक्ती खरं बोलत असेल आणि आपला पुर्वगृह '"खोटारडा" असाच असेल तर त्याच्या चांगूलपणाचा आपल्या दृष्टीने उपयोग शून्यच!!!!! नाही का???

Tuesday, 27 October 2015

शुभ रात्री

प्रेरणादायी...: शंतनू (बालकथा)

प्रेरणादायी...: शंतनू (बालकथा)

नमस्कार! मित्रांनो शुभ संध्या

आनंदमार्गाच्या सर्व वाचकांना आजपासून  एक नवीन ब्लाॅग उपलब्ध करून देण्यात आला आहे. www.aanandmarg.blogspot.com  या संकेतस्थळावर आजपासून पोस्ट असतील.
   या पुर्वीच्या सर्व पोस्ट खालील संकेतस्थळावर वाचू शकाल www.aanandmarg.wordpress.com

आपणा सर्वांचे मनापासून आभार मानतो  कारण तुमच्या पसंतीमुळेच आनंदमार्ग लिहित आहे.
                     धन्यवाद!!