पाॅलिश पेपर
लेखन - एच. बी. पुरी
जीवन जगत असताना आपल्याला अनेक अनुभव येत असतात. अनुभवाने माणूस शहाणा होतो यावर माझा ठाम विश्वास आहे. "Nothing in the world good or bad we make it". या जगात चांगले आणि वाईट असे काहीच नसते आपण ते ठरवतो. चांगल्याला वाईट म्हणणारे लोक असतात आणि वाईटाला चांगले म्हणणारेही लोक असतात. असो. ...
आपली प्रगती जर आपल्याला करायची असेल तर आपण कमळाच्या पानांसारखे रहायला हवं. म्हणजे बघा कमळ पाण्यात, चिखलात फुलते मात्र त्यावर पाणी साचत नाही किंवा चिखलही साचत नाही.
आता पाॅलिश पेपर म्हणजे काय ते सांगतो . असे म्हणतात "निंदकाचे घर असावे शेजारी" कारण जे आपली निंदा करतात ते आपल्यासाठी पाॅलिश पेपर सारखे काम करतात. निंदा करणारे आपल्या त्रुटी, दोष दूर करण्याचे काम करतात आणि मग आपण अधिकाधिक चांगल्या प्रकारे काम करण्याचा प्रयत्न करीत असतो. म्हणजेच आपल्याला प्रेरणा मिळते.
म्हणून निंदकाचे घर असावे शेजारी असे म्हणतात असं मला वाटतं. पटतयं का?
No comments:
Post a Comment