आनंदमार्ग
Way Of Happiness
लेखन-श्री. एच.बी.पुरी
नमस्कार मित्रांनो,
आनंद Bank आणि love Bank
आनंदी राहण्यासाठी प्रेमाची बँक कशी भरावी हे आपण पाहत आहोत. आजच्या भागात प्रेमाचे बँक खाते कसे भरावे यातील प्रकार दुसरा पाहूया
2- सहवास - प्रेमाचे बँक खाते भरण्याचा दुसरा पण महत्त्वपूर्ण प्रकार म्हणजे सहवास.सहवासाची ओढ सर्वाना असते लहान असो की मोठी माणसे सर्वाना आपले प्रेमाचे माणूस जवळ असावे अस वाटत. सहवासाची अपेक्षा असणाऱ्या व्यक्तीमध्ये भेट किंवा बक्षिस याची गरज नसते तर आपला संपूर्ण वेळ त्याना हवा असतो. वेळ देणं म्हणजे ऑफिस ला न जाता घरी बसून ऑफीसची काम करणं असं नाही.असं केलं तर समोरची व्यक्ती कंटाळून म्हणेल उगाच सुट्टी घेतली त्यापेक्षा ऑफिस ला जा .
सहवासाची अपेक्षा असणाऱ्या व्यक्तींना केवळ आपला वेळ हवा असतो, सहवास हवा असतो, निखळ मनसोक्त गप्पा मारत दिवस व्यतीत करावा अस केलं तर नक्कीच प्रेमाच्या बँक खात्यात भर पडेल नाही का??
पटतय ना??
अधिक माहितीसाठी
www.aanandmarg.blogspot.com
धन्यवाद!!
No comments:
Post a Comment