Friday 7 April 2017

टीम वर्क

*टीम (TEAM) म्हणजे नक्की काय ?*

▪एकदा एक श्रीमंत उद्योगपती एका खेडेगावात कारखान्यासाठी साईट बघायला गेला होता ...

▪रस्ता कच्चा, खडबडीत होता. काही ठिकाणी रस्त्यात पाणी पण साठले होते, खुप चिखल झाला होता. येताना त्या उद्योगपतीची गाडी चिखलात रुतली आणि बंद पडली ...

▪कोणाची मदत मिळते का हे बघायला तो गाडितून खाली उतरला. त्याला थोड्या अंतरावरू एक म्हातारे शेतकरीबाबा येताना दिसले. त्याने त्या शेतकरीबाबांना थांबले, गाडी चिखलात रुतल्याचे सांगीतले व मदत करण्याची विनंती केली ...

▪शेतकरी बाबा गाडीजवळ आले, पहाणी केली आणि म्हणाले, ‘ नामदेवला, म्हणजे नाम्याला बोलवायला लागेल ...!’

▪‘मग बोलवाना तुमच्या त्या नाम्याला! मी त्याला चांगले बक्षीस देईन! मस्त जेवायला, खायला घालेन ...!’ तो उद्योगपती म्हणाला ...

▪आहो नाम्या म्हणजे कोणी माणुस नाही. तो येक बैल आहे. मी आत्ता त्याला घेऊन येतो!’ ते शेतकरी म्हातारबाबा म्हणाले व लगेचच ‘नाम्याला’ म्हणजे त्या बैलाला घेऊन आले ...

▪त्या बैलाला दोरीच्या सहाय्याने गाडीला जुंपले आणि म्हणाले ...
‘हे हरबा खेच! हे ढवळ्या खेच! हे नाम्या खेच! हे पवळ्या खेच!’

▪त्याबरोबर त्या बैलाने जोर लाऊन ती गाडी चिखलातून खेचून बाहेर काढली. हे बधून तो उद्योगपती खुष झाला पण त्याला समजेना की गाडीला एकच बैल जुंपलेला असताना त्या म्हातारबाबांनी चार बैलांची नावे का घेतली ...

▪उद्योगपतीने त्याचे कारण विचारले तेव्हा ते म्हातारबुवा उत्तरले ...
‘ त्याचे काय आहे! आमचा नाम्या आहे म्हातारा आणि आंधळा. त्याला दिसत नाही. त्यामुळे त्याला एकट्यालाच गाडीला जुंपले आहे हे त्याला माहीत नाही. मी अजून तीन बैलांची नावे घेतली कारण नाम्याला वाटावे की त्याच्याबरोबर अजून तीन बैल आहेत. म्हणजे तो टिममध्ये काम करतो आहे. म्हणूनच तो त्याची ताकद पणाला लाऊन सर्वोत्तम काम करून दाखवतो. साहेब तुमच्या भाषेत याला ‘टीम स्पिरीट’ म्हणतात नाही का?’

▪एका पागोटे, मुंडासेवाल्या म्हातार्‍या शेतकरीबुवांचे हे बोलणे ऐकून तो उद्योगपती चाटच पडला ...

▪या कथेतील मतितार्थ ....
👉🏻कोणतेही काम हे टिम/संघटन केल्याशिवाय होणे अशक्य जरी असले तरी त्या टिम मधिल सर्व घटकांनी कोणाचीही वाट न पाहता जर जीव ओतून व जोर लावून काम केल्यास ते कार्य अव्दितीय व चोक झाल्याशिवाय राहत नाही ...
👉🏻 आपल्या बरोबर कोणी असू नाही तर नसू आपल्यावर असणारी जबाबदारी आपण अगदी चोकपणे करु शकतो हा विश्वासच आपल्याला मनोबल देवून कार्य करुन घेण्यास सहाय्य करत असतो ...
👉🏻 आपण स्वत: म्हणजेच एक टिम आहे असे समजून व प्रत्येक सहकार्‍या बरोबर स्वत: पुढे होऊन कार्य केल्यास बरोबर असणारांचाही आत्मविश्वास वाढत असतो ...
👉🏻 टिम किंवा संघटणात्मक काम करत असताना मी बरोबर आहे तुम्ही हे करा, तुम्ही ते करा असे सांगून बघत बसणारे त्या टिमसाठी घातक मेंबर ठरतात ...
👉🏻 मी हे करु शकतो आणि मीच करणार, फक्त माला या कामात थोडी मदत करा असे म्हणून कार्य करणारे ग्रेट असतात ...

         *👉🏻 TEAM या शब्दाचा अर्थ .....✍🏻*
                   *👍🏻 T = Together ....*
                   *👍🏻 E = Everyone ...*
                   *👍🏻 A = Achieves ...*
                   *👍🏻 M = More ...*

Saturday 1 April 2017

आंनद bank आणि love bank भाग-५

आनंदमार्ग
Way Of Happiness
लेखन-श्री. एच.बी.पुरी
नमस्कार मित्रांनो,

आनंद Bank  आणि love Bank
आनंदी राहण्यासाठी प्रेमाची बँक कशी भरावी हे आपण पाहत आहोत. आजच्या भागात प्रेमाचे बँक खाते कसे भरावे यातील प्रकार पाचवा आणि शेवटचा पाहूया

५- स्पर्श
          या प्रकारातील व्यक्तींना भेटीची, सहवासाची, सकारात्मक शब्दाची, किंवा अन्य कोणतीही अपेक्षा नसते त्याना स्पर्शातून प्रेमाची जाणीव होत असते जो पर्यंत तो स्पर्श मिळत नाही तोपर्यंत त्याना आपल्या प्रेमाची खात्री पटत नाही. उदा. दिवसभर काम करून वडील जेव्हा घरी येतात तेव्हा मूल संद्यकाली त्यांना मिठी मारते. त्या मुलाला वडिलांचा स्पर्श हवा असतो. वडील सुद्धा मुलाला जवळ घेऊन आंजरतात तेव्हा मुलाला आनंद होतो म्हणजेच त्याला वडील आपल्यावर प्रेम करतात याची खात्री पटते.
       स्पर्शातून प्रेम फक्त लहान मुलांनाच हवं असत अस नाही. अनाथ आश्रमात असलेल्या सर्वच व्यक्ती या प्रेमाच्या भुकेल्या असतात , लहान थोर सगळ्याच व्यक्तींना ही भावना हवी असते . कोणाकडून तरी प्रेमाचा स्पर्श मिळावा या हेतूने ते आधार शोधत असतात. आशा व्यक्तींना आपण खरोखरच आनंदी करू शकतो फक्त आपला वेळ खर्च करावा लागेल नाही का???
         धन्यवाद !!!

Friday 31 March 2017

आनंद bank आणि love bank भाग -४

आनंदमार्ग
Way Of Happiness
लेखन-श्री. एच.बी.पुरी
नमस्कार मित्रांनो,

आनंद Bank  आणि love Bank
आनंदी राहण्यासाठी प्रेमाची बँक कशी भरावी हे आपण पाहत आहोत. आजच्या भागात प्रेमाचे बँक खाते कसे भरावे यातील प्रकार चौथा पाहूया
४-सेवा
    काही व्यक्तींच्या लेखी प्रेम याचा अर्थ सेवा हा असतो अशा व्यक्तींना सकारात्मक शब्दांची गरज नसते त्यांना भेटवस्तूची गरज नसते आपण वेळ दिला ,पिकनिक,प्रवासाला नेले तरी त्याना आपल्या प्रेमाची खात्री वाटत नाही या कृतींचा ते नेहमीच वेगळा अर्थ काढत असतात.
         सेवा हवी असणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या छोट्या मोठ्या कार्यात मदत करून आपण त्यांच्या लव्ह बँकेत भर टाकू शकता. जोवर आपण त्यांच्यासाठी काही सेवाकार्य करत नाही तोवर त्यांना आपल्या प्रेमाची अनुभूतीचा येत नाही उदा. कधी आपल्या पत्नीला भांडी धुण्यासाठी पतिने मदत केली तर तिचे पतीबद्दलचे प्रेम इतके उफाळून येते,कि पतीला प्रिय असणाऱ्या गोष्टी ती आनंदाने करू लागते. आपण केलेले असे लहानसे काम जर एवढा मोठा चमत्कार घडवून आणत असेल तर मग ते काम का करू नये?
       मी पुरुष आहे.. मी हि बायकी कामे कशी करू? मी स्त्री आहे ,मी पुरुषी कामे कशी करू ?... अशी आपली धारणा असेल तर आपण खऱ्या प्रेमाचा अनुभव कधी घेऊ शकणार नाही आणि आपल्या आप्तजनांचे प्रेम मिळवू शकणार नाही..
        धन्यवाद!!
अधिक माहितीसाठी
www.aanadmarg.blogspot.com

Sunday 26 March 2017

आंनद bank आणि love bank भाग -३

आनंदमार्ग
Way Of Happiness
लेखन-श्री. एच.बी.पुरी
नमस्कार मित्रांनो,

आनंद Bank  आणि love Bank
आनंदी राहण्यासाठी प्रेमाची बँक कशी भरावी हे आपण पाहत आहोत. आजच्या भागात प्रेमाचे बँक खाते कसे भरावे यातील प्रकार  तिसरा पाहूया
३-सकारात्मक प्रतिसाद--
        व्यक्ती करत असलेल्या कामात त्याला मदत किंवा प्रेरणा किंवा अधिक मार्गदर्शन केले तर त्याला आनंद होतो . तो करत असलेल्या कामाचे कौतुक करावे अस त्याला नेहमी वाटत असते . कौतुक म्हणजेच सकारात्मक प्रतिसाद positive feedback  मिळत असेल तर व्यक्ती अधिक ऊर्जेने काम करू लागते .
       या प्रकारातील व्यक्तींना काही अपेक्षा नसते त्यांना फक्त हवं असत इतरांनी आपल्याला चांगलं म्हणावं ,कौतुक करावं, positive response ,यामुळे चुका झाल्या तरी त्या दुरुस्त होतात .
परिणामी व्यक्ती आनंदी राहते व प्रेमाची बँक पुन्हा भरू लागते.
अधिक माहितीसाठी
www.aanandmarg.blogspot.com
           धन्यवाद!!

Sunday 19 March 2017

आनंद Bank आणि Love Bank भाग-२

आनंदमार्ग
Way Of Happiness
लेखन-श्री. एच.बी.पुरी
नमस्कार मित्रांनो,

आनंद Bank  आणि love Bank
आनंदी राहण्यासाठी प्रेमाची बँक कशी भरावी हे आपण पाहत आहोत. आजच्या भागात प्रेमाचे बँक खाते कसे भरावे यातील प्रकार दुसरा पाहूया

2-  सहवास - प्रेमाचे बँक खाते भरण्याचा दुसरा पण महत्त्वपूर्ण प्रकार म्हणजे सहवास.सहवासाची ओढ सर्वाना असते लहान असो की मोठी माणसे सर्वाना आपले प्रेमाचे माणूस जवळ असावे अस वाटत. सहवासाची अपेक्षा असणाऱ्या व्यक्तीमध्ये भेट किंवा बक्षिस याची गरज नसते तर आपला संपूर्ण वेळ त्याना हवा असतो. वेळ देणं म्हणजे ऑफिस ला न जाता घरी बसून ऑफीसची काम करणं असं नाही.असं केलं तर समोरची व्यक्ती कंटाळून म्हणेल उगाच सुट्टी घेतली त्यापेक्षा ऑफिस ला जा .
         सहवासाची अपेक्षा असणाऱ्या व्यक्तींना केवळ आपला वेळ हवा असतो, सहवास हवा असतो, निखळ मनसोक्त गप्पा मारत दिवस व्यतीत करावा अस केलं तर नक्कीच प्रेमाच्या बँक खात्यात भर पडेल नाही का??
पटतय ना??
अधिक माहितीसाठी
www.aanandmarg.blogspot.com
               धन्यवाद!!

Saturday 18 March 2017

आनंद बँक आणि love Bank भाग-१

आनंदमार्ग
Way Of Happiness
लेखन-श्री. एच.बी.पुरी
नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ

आनंद Bank  आणि love Bank
आनंदी राहण्यासाठी प्रेमाची बँक भरलेली असावी असं कालच्या भागात आपण पाहिले.
प्रेमाचे बँक खाते कसे भरायचे यातील पहिला प्रकार पाहू

१. भेट,बक्षीस किंवा उपहार
प्रेम मिळवण्यासाठी हा प्रकार लहान मुलांत अधिक प्रमाणात असतो.लहान मुलांना जो पर्यंत आपण काही भेट देत नाही तो पर्यंत त्यांना आपण त्यांच्यावर प्रेम करत नाही असेच वाटते.भेट किंवा बक्षीस मिळावे अशी लहान मुलांची अपेक्षा असते कारण प्रेमाची परिभाषा त्याच्यापुरती केवळ तीच असते.
        भेट बक्षिस किंवा उपहारची अपेक्षा लहान मुलांत च असते असे नाही मोठ्या माणसांत देखील असते. भेटवस्तू अगदीच जास्त किमतीची असावी असं काही नाही.कुटुंबातील व्यक्तींना तिच्या नकळत आपण एखादी भेट देऊ केली तर तिला आनंद होतो म्हणजेच तिला जाणीव होते आपण तिच्यावर प्रेम करत आहोत. म्हणजेच प्रेमाच्या बँक खात्यात भर पडली.हा एक मात्र काळजी घ्यायला हवी कि भेटवस्तूची सवय होता कामा नये.नाहीतर प्रेम म्हणजे फक्त काहीतरी देणे आणि घेणे असं व्हायला नको.
प्रेमाचे बँक खाते कसे भरायचे हे आपण आता पहिले दुसरा प्रकार (क्रमशः)..
अधिक माहितीसाठी
www.aanandmarg.blogspot.com
            धन्यवाद!!

       

Friday 17 March 2017

आनंद Bank आणि love Bank

आनंद Bank आणि love Bank
लेखन- श्री.एच.बी.पुरी

आपल्या आनंदाच्या बँकेतील खात्यावर जेव्हा भरपूर जमा असते तेव्हा आपण इतरांनाही आनंद वाटतो.जेव्हा त्या खात्यावरील शिल्लक कमी होते तेव्हा आपण इतरांकडून आनंद हिरावून घेण्याची ,इतरांच्या खात्यावर डल्ला मारण्याची खटपट करतो.त्याचप्रमाणे आपल्या प्रेम बँकेतील खात्यावर भरपूर शिल्लक असते तेव्हा आपण इतरांना प्रेम वाटतो.त्या खात्यावर जेव्हा बाकी शून्य होते,खाते रिकामे होते तेव्हा इतरांबद्दल आपण द्वेष,मत्सर,इर्षा करू लागतो.
            या दोन्ही बँकांचा परस्परांशी घनिष्ट संबंध आहे. एकमेकांवर त्याचा परिणाम होतो.आनंद बँकेतील खात्यावर भरपूर जमा असते तेव्हा प्रेम वाटतो;प्रेम बँकेतील खात्यावर भरपूर जमा असते तेव्हा आपण आनंदात असतो.
        आनंदी राहण्यासाठी प्रेमाची बँक भरलेली असणे गरजेचे आहे.प्रेमाची बँक पुढील पाच प्रकारे भरता येऊ शकते
उपहार किंवा भेट,सहवास,सकारात्मक प्रतिसाद, सेवा आणि स्पर्श..
      वरील पाचही प्रकार विस्तृतपणे मांडणार आहे उद्या पासून... (क्रमशः)