Wednesday, 13 July 2016

पाॅलिश पेपर

पाॅलिश पेपर
लेखन - एच. बी. पुरी

जीवन जगत असताना आपल्याला अनेक अनुभव येत असतात. अनुभवाने माणूस शहाणा होतो यावर माझा ठाम विश्वास आहे. "Nothing in the world good or bad we make it". या जगात चांगले आणि वाईट असे काहीच नसते आपण ते ठरवतो. चांगल्याला वाईट म्हणणारे लोक असतात आणि वाईटाला चांगले म्हणणारेही लोक असतात. असो. ...
    आपली प्रगती जर आपल्याला करायची असेल तर आपण कमळाच्या पानांसारखे रहायला हवं. म्हणजे बघा कमळ पाण्यात, चिखलात फुलते मात्र त्यावर पाणी साचत नाही किंवा चिखलही साचत नाही.
      आता पाॅलिश पेपर म्हणजे  काय ते सांगतो . असे म्हणतात "निंदकाचे घर असावे शेजारी" कारण जे आपली निंदा करतात ते आपल्यासाठी पाॅलिश पेपर सारखे काम करतात. निंदा करणारे आपल्या त्रुटी, दोष दूर करण्याचे काम करतात आणि मग आपण अधिकाधिक चांगल्या प्रकारे काम करण्याचा प्रयत्न करीत असतो. म्हणजेच आपल्याला प्रेरणा मिळते. 
       म्हणून निंदकाचे घर असावे शेजारी असे म्हणतात असं मला वाटतं. पटतयं का?

Monday, 4 April 2016

विचार करून पहा

रेल्वेच्या खिडकीत बसून. प्रवास करणाऱा२४ वर्षाच्या मुलगा मोठ्याने ओरडून आपल्या वडिलांना म्हणाला, पप्पा बघा झाड मागे पळत अाहेत.वडील त्याच्याकडे पाहून हसले.त्यांच्या समोर एक जोडप बसले होते.त्यांना तो मुलगा अबनार्मल वाटला इतक्यात तो मुलगा परत ओरडला, पप्पा ढग आपल्या बरोबर पळत आहेत. समोर बसलेले जोडपे त्या मुलांच्या वडिलांना म्हणाले, तुम्ही मुलाला चांगल्या डाक्टर कडे का नाही दाखवत.वडील हसले आम्ही आता हास्पीटल मधूनच येत अाहोत. माझा मुलगा जन्मतःच अंध आहे.त्याला अाजच डोळे मिळाले.
या जगातील प्रत्येक माणसाची एक वेगळी कथा असते. समोरच्या माणसाबद्दल खात्री असल्याशिवाय आपले मत बनवू नये. कारण सत्य हे कदाचित आश्चर्यकारक असू शकते.....

Tuesday, 15 March 2016

विचार आणि भावना

ॐ मंत्र सोपा. .

“ॐ” हे अक्षर हिंदू धर्मियांकरीता अत्यंत महत्वाची आणि पवित्र धार्मिक बाब असली तरीही एवढ्यापुरताच ह्या अक्षराचे महत्व मर्यादित नाही. ॐ नामाचा नियमित जप आरोग्याच्या दृष्टीनेही अतिशय फायदेशीर ठरू शकतो. त्यासाठी पहाटे लवकर उठून ओंकाराचा जप करावा. ॐ नामाचा उच्चार पद्मासन, अर्धपद्मासन, सुखासन, वज्रासन करीत असतांनाही आपण करू शकतो. ॐ नामाचा जप केल्याने खालील फायदे आपल्या शरीराला मिळू शकतात….
१) अनेक वेळा ॐ अक्षराचा जप केल्याने पूर्ण शरीर तणावमुक्त होतं.
२) घाबरल्यासारखे वाटणे किंवा बेचैनी यांवर ॐ अक्षराचा जप करणे सर्वांत उत्तम उपाय आहे.
३) ॐ अक्षराचा जप केल्याने शरीरातील नकारात्मक तत्व दूर होतात तसेच तणावाच्या परिस्थितीत उत्पन्न होणाऱ्या द्रव्यांवरदेखील नियंत्रण ठेवले जाते.
४) ॐ अक्षराचा जप केल्यास हृदय आणि रक्ताभिसरण संतुलित राहते.
५) ॐ अक्षराचा जप केल्यास पचनशक्ती सुधारते.
६) ॐ अक्षराचा जप केल्याने शरीरात तरुणावस्थेतील उत्साह पुन्हा परत येतो.
७) थकव्यापासून बचावासाठी ॐ अक्षराचा जप करण्याव्यतिरिक्त दुसरा चांगला उपाय नाही.
८) ॐ अक्षराचा जप केल्याने झोप न येण्याच्या समस्येपासून त्वरित सुटका मिळते. रात्री झोपतांना झोप येईपर्यंत ॐ अक्षराचा जप केल्यास झोप येणे निश्चित आहे.
९) प्राणायाम करण्याच्या काही विशेष पद्धतींमध्ये ॐ अक्षराचा जप केल्यास फुफ्फुसांमध्ये मजबुती येते.
१०) ॐ च्या पहिल्या शब्दाचा उच्चार केल्यास शरीरात कंपन तयार होते. ह्या कंपनाने पाठीचा कणा प्रभावित होऊन त्याची क्षमता वाढते.
ॐ च्या दुसऱ्या शब्दाचा उच्चार केल्यास गळ्यात कंपन तयार होते. हे कंपन थायरॉईड ग्रंथीवर प्रभाव टाकते.

Sunday, 13 March 2016

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं. ...

"" प्रेम  ""
          Prem(Love)

एका गावात एक मुलगी राहात असते. तिला चार मित्र असतात.

त्यापैकी चौथ्या मित्रावर ती जिवापाड प्रेम करत असते. त्याला ती नेहमी
मोठमोठ्या भेटवस्तू देत असते. जगातली सर्वांत महत्त्वाची गोष्ट त्याला मिळायला
हवी, असा तिचा कटाक्ष असे.

त्या खालोखाल तिसऱ्या मित्रावरही ती प्रेम करत असते. त्याला ती नेहमी शेजारची
राज्ये दाखवत असते; मात्र, ते बघून तो आपल्याला कधीतरी सोडून जाईल अशी भीती
तिच्या मनात नेहमीच असते.

दुसऱ्या मित्रावरही ती प्रेम करत असते. त्याचा आत्मविश्‍वास वाखाणण्या सारखा
असतो. मनाने तो खूप प्रेमळ, दयाळू आणि संयमी असतो. तो तिला नेहमी समजून घेत
असतो. ती जेव्हा कधी संकटात सापडते, काही समस्या तिला भेडसावतात; तेव्हा तेव्हा
ती आपले मन त्याच्याकडे मोकळे करते. तोही तिला समजून घेतो, त्यातून बाहेर
पडण्याचा मार्ग सांगतो.

तिचा पहिला मित्र अतिशय निष्ठावान असतो. तिची संपत्ती, तिची मालमत्ता राखण्यात
त्याचा मोठा सहभाग असतो. तरीही, तिला तो फारसा आवडत नसतो. तो मात्र तिच्यावर
खूप मनापासून प्रेम करत असतो. ती क्वचितच त्याची दखल घेत असते.

एक दिवस ती मुलगी आजारी पडते. उपचारांचाही काही परिणाम होत नाही. आपल्याकडे खूप
कमी वेळ आहे, हे तिच्या लक्षात येते. तिच्या मनात विचार येतो, ""माझ्या कडे
भरपूर संपत्ती आहे. माझे जिवाभावाचे चार मित्र आहेत; पण जेव्हा माझा मृत्यू
होईल, तेव्हा मी एकटीच असेन.'' या विचारांनी ती अस्वस्थ होते.

ती आपल्या सर्वांत आवडत्या चौथ्या मित्राला म्हणते, "मी तुझ्यावर सर्वाधिक
प्रेम केले. जगातल्या सर्वांत मौल्यवान भेटी मी तुला सतत दिल्या. तुझी खूप
काळजी घेतली. आता माझा अंतकाळ जवळ आला आहे. तू माझ्या बरोबर येशील ना? माझी साथ
करशील ना?''

"अजिबात नाही,'' असे म्हणून आणखी काहीही न बोलता तो मित्र निघून जातो.

त्याचे हे बोलणे तिचे काळीज चिरत जाते.

त्यानंतर ती मुलगी तिसऱ्या मित्राकडे येते. "आयुष्यभर मी तुझ्यावर प्रेम केले.
आता मी काही दिवसांचीच सोबती आहे. तू माझ्याबरोबर येशील ना?''
तिच्या या बोलण्यावर तो थंडपणे "नाही'' म्हणतो. " जीवन खूप सुंदर आहे. तू
गेल्यानंतर मी दुसऱ्या मुलीबरोबर लग्न करीन.''

त्याच्या या बोलण्यावर ती निराश होते.

आपली निराशा लपवत ती दुसऱ्या मित्राकडे येते. ""मी नेहमीच तुझ्याकडे मदतीच्या
अपेक्षेने येते. तूही मला मदत करतोस. माझ्या सुख-दुःखात सहभागी होतोस. यावेळीही
तसाच वागशील ना..? येशील ना माझ्या बरोबर....?''

""मी तुझ्याबरोबर जास्तीत जास्त दफनभूमी पर्यंत येऊ शकेन. त्यापुढे नाही.''

त्याच्या या उत्तराने ती मुलगी पुरती कोलमडून जाते. काय करावे तिला कळत नाही.

.... तेवढ्यात एक आवाज येतो, "मी येईन तुझ्या बरोबर. तू जिथे जाशील, तिथे मी
येईन.''

ती मुलगी आवाजाच्या दिशेने बघते, तर समोर तिचा पहिला मित्र असतो.. पोषणा अभावी,
दुर्लक्षामुळे खूप अशक्त झालेला.
मुलगी म्हणते, " मी खरेतर तुझी खूप काळजी घ्यायला हवी होती; पण आता वेळ निघून
गेली आहे.''

वास्तवातही, या मुलीप्रमाणे आपलेही चार मित्र असतात.

आपला चौथा मित्र म्हणजे शरीर. त्याचे आपण कितीही कौतुक केले, कितीही चोचले
पुरवले, तरीही मरणाच्या वेळी ते आपले साथ सोडते.

आपला तिसरा मित्र म्हणजे, आपली
मालमत्ता, संपत्ती, आपली पत- प्रतिष्ठा. आपल्या मरणानंतर हे सगळे आपोआप
दुसऱ्याचे होते.

दुसरा मित्र म्हणजे, आपले कुटुंबीय आणि मित्रपरिवार. ते आपल्या
कितीही जवळचे असले, तरी आपली सोबत ते जास्तीत जास्त दफनभूमी पर्यंतच करू शकतात.

आणि पहिला मित्र म्हणजे कोण....?........

... पहिला मित्र म्हणजे आपला 'अंतरात्मा' (परमेश्वेर) ज्याच्याकडे आपण जास्त
लक्ष देत नहीं अणि तोच आपला शेवटपर्यंत सोबती असतो....
🔹नाती जपण्यात मजा आहे
🔸बंध आयुष्यचे विणण्यात मजा आहे.
🔹जुळलेले सूर गाण्यात मजा आहे.
🔸येताना एकटे असलो तरी
सर्वांचे होऊन जाण्यात मजा आहे
🔹नशीब कोणी दुसरं लिहित नसतं आपल नशीब आपल्याच हाती असतं
🔸येताना काही आणायच नसतं
जाताना काही न्यायचं नसतं  मनजे हे आयुष्य तरी कोणासाठी जगायचं असतं
🔹याच प्रश्नाचे उत्तर
शोधण्या साठी जन्माला यायचं असतं.