Friday, 4 March 2016

वाढदिवस

आज माझ्या पत्नीचा वाढदिवस आज मी तिला लाख लाख शुभेच्छा देतो, माझे सर्व सुख तिला आणि तिचे सर्व दुःख मी घेतो. प्रिये प्रत्येक दिवस तुझा असा असावा, कि प्रत्येकाला तुझा हेवा वाटावा. तुझ्या जीवनात कधी दुःखाची सर नसावी, प्रत्येक क्षणी सुखाने भरलेली तुझी ओंजळ असावी. देवाने तुला इतके सुख द्यावे, की तु एका दुःखासाठी तरसावी. आज देवाला हात जोडूणी सांगतो, तुझ्यासाठी मी एकच मागणी मागतो. की हे देवा माझ्या पत्नीला आज असंख्य आनंदाने भरलेले समुद्र द्यावे. त्याच्यासाठी जर कुणाचा जीव पाहीजे असल्यास तर माझे प्राण आनंदाने घ्यावे..... वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...............!

संसार

संसार म्हणजे चालायचचं !!

घर कितीही आवरलं
तरी दिवसभर पसरायचंच.
कट्टा पुसून ठेवला की
दुध उतू जायचंच
संसार म्हणजे चालायचचं.

रविवारी एखाद्या खूष होऊन
हॉटेलात मोठ्ठ बिल करायचं.
खिरीतल्या वेलदोड्याचे टरफल मात्र
चहाच्या डब्यात जायचंच.
संसार म्हणजे चालायचचं.

पोरांसाठी सगळं करतो म्हणलं
तरी कधी त्यांनाच रागवायचं.
रडून झोपले की
पांघरूण घालताना कुरवाळायचं
संसार म्हणजे चालायचचं.

बाहेर कितीही चेष्टा केली तरी
तू मला आणि मीच तुला ओळखयाच.
शॉपिंग ला गेल्यावर,
दोघांनी एकाच स्वस्त वस्तूला उचलायचं.
संसार म्हणजे चालायचचं.

धावपळ करून का होईना
चौकोनी कुटुंब सांभाळायचं.
आजारी पडल्यावर, सगळा धीर गळून 
आई-बाबांनाच आठवायचं.
संसार म्हणजे चालायचचं.

जरा एका जागी स्थिरावलं की
पुढे जायला बस्तान हलवायचं.
आधीचं सोडून चूक तर नाही न केली
हे एकमेकांना विचारायचं.
संसार म्हणजे चालायचचं.

छोट्या छोट्या गोष्टींवरून
तुझं माझं भांडण व्हायचंच.
आयुष्य मात्र सगळं विसरून
एकत्र  होऊन जगायचं.
संसार म्हणजे चालायचचं.

Thursday, 3 March 2016

अपेक्षा

रात के समय एक दुकानदार अपनी दुकान बन्द ही कर रहा था
कि एक कुत्ता दुकान में आया । उसके मुॅंह में एक थैली थी। जिसमें सामान की लिस्ट और पैसे थे।

दुकानदार ने पैसे लेकर सामान उस थैली में भर दिया।
कुत्ते ने थैली मुॅंह मे उठा ली और चला गया।

दुकानदार आश्चर्यचकित होके कुत्ते के पीछे पीछे गया

ये देखने की इतने समझदार कुत्ते का मालिक कौन है।

कुत्ता बस स्टाॅप पर खडा रहा। थोडी देर बाद एक बस आई जिसमें चढ गया।

कंडक्टर के पास आते ही अपनी गर्दन आगे कर दी।
उस के गले के बेल्ट में पैसे और उसका पता भी था।

कंडक्टर ने पैसे लेकर टिकट कुत्ते के गले के बेल्ट मे रख दिया।

अपना स्टाॅप आते ही कुत्ता आगे के दरवाजे पे चला गया और पूॅंछ हिलाकर कंडक्टर को इशारा कर दिया।
बस के रुकते ही उतरकर चल दिया।

दुकानदार भी पीछे पीछे चल रहा था।
कुत्ते ने घर का दरवाजा अपने पैरोंसे २-३ बार खटखटाया।

अन्दर से उसका मालिक आया और लाठी से उसकी पिटाई कर दी।

दुकानदार ने मालिक से इसका कारण पूछा । मालिक बोला

"साले ने मेरी नींद खराब कर दी। चाबी साथ लेके नहीं जा सकता था गधा।"

जीवन की भी यही सच्चाई है। आपसे लोगों की अपेक्षाओं का कोई अन्त नहीं है।

जहाँ आप चूके
वहीं पर बुराई निकाल लेते हैं
और पिछली सारी अच्छाईयों को
भूल जाते हैं।

। यही संसार हैं ।