Wednesday, 13 July 2016

प्रयत्नशील बना

प्रयत्नशील बना
लेखन -श्री. एच. बी. पुरी

पावसाचे थेंब भलेही छोटे- छोटे असूद्या पण जर पाऊस सतत सुरू राहिला तर मोठ्या जलाशयात रूपांतर होते. असेच आपले छोटे छोटे प्रयत्न निश्चितच जीवन परिवर्तन करण्यास सहाय्यक ठरतील.

प्रयत्न किंवा साहस छोटे किंवा मोठे हे महत्वाचे नाही तर त्यात सातत्य असणे  आवश्यक आहे. माणूस प्रयत्नवादाने काहीही करू शकतो. नदीच्या काठावर बसून राहिला तर त्याला पोहता येणार आहे का?  पाण्यात पडल्यावर हात पाय हलवून नक्की पोहता येते.

म्हणून "Try Try But Don't Cry"
प्रयत्न करत रहा यशाची पहिली पायरी चढणे  सोपे जाईल.
                                           धन्यवाद !!

पाॅलिश पेपर

पाॅलिश पेपर
लेखन - एच. बी. पुरी

जीवन जगत असताना आपल्याला अनेक अनुभव येत असतात. अनुभवाने माणूस शहाणा होतो यावर माझा ठाम विश्वास आहे. "Nothing in the world good or bad we make it". या जगात चांगले आणि वाईट असे काहीच नसते आपण ते ठरवतो. चांगल्याला वाईट म्हणणारे लोक असतात आणि वाईटाला चांगले म्हणणारेही लोक असतात. असो. ...
    आपली प्रगती जर आपल्याला करायची असेल तर आपण कमळाच्या पानांसारखे रहायला हवं. म्हणजे बघा कमळ पाण्यात, चिखलात फुलते मात्र त्यावर पाणी साचत नाही किंवा चिखलही साचत नाही.
      आता पाॅलिश पेपर म्हणजे  काय ते सांगतो . असे म्हणतात "निंदकाचे घर असावे शेजारी" कारण जे आपली निंदा करतात ते आपल्यासाठी पाॅलिश पेपर सारखे काम करतात. निंदा करणारे आपल्या त्रुटी, दोष दूर करण्याचे काम करतात आणि मग आपण अधिकाधिक चांगल्या प्रकारे काम करण्याचा प्रयत्न करीत असतो. म्हणजेच आपल्याला प्रेरणा मिळते. 
       म्हणून निंदकाचे घर असावे शेजारी असे म्हणतात असं मला वाटतं. पटतयं का?

Monday, 4 April 2016

विचार करून पहा

रेल्वेच्या खिडकीत बसून. प्रवास करणाऱा२४ वर्षाच्या मुलगा मोठ्याने ओरडून आपल्या वडिलांना म्हणाला, पप्पा बघा झाड मागे पळत अाहेत.वडील त्याच्याकडे पाहून हसले.त्यांच्या समोर एक जोडप बसले होते.त्यांना तो मुलगा अबनार्मल वाटला इतक्यात तो मुलगा परत ओरडला, पप्पा ढग आपल्या बरोबर पळत आहेत. समोर बसलेले जोडपे त्या मुलांच्या वडिलांना म्हणाले, तुम्ही मुलाला चांगल्या डाक्टर कडे का नाही दाखवत.वडील हसले आम्ही आता हास्पीटल मधूनच येत अाहोत. माझा मुलगा जन्मतःच अंध आहे.त्याला अाजच डोळे मिळाले.
या जगातील प्रत्येक माणसाची एक वेगळी कथा असते. समोरच्या माणसाबद्दल खात्री असल्याशिवाय आपले मत बनवू नये. कारण सत्य हे कदाचित आश्चर्यकारक असू शकते.....

Tuesday, 15 March 2016

विचार आणि भावना

ॐ मंत्र सोपा. .

“ॐ” हे अक्षर हिंदू धर्मियांकरीता अत्यंत महत्वाची आणि पवित्र धार्मिक बाब असली तरीही एवढ्यापुरताच ह्या अक्षराचे महत्व मर्यादित नाही. ॐ नामाचा नियमित जप आरोग्याच्या दृष्टीनेही अतिशय फायदेशीर ठरू शकतो. त्यासाठी पहाटे लवकर उठून ओंकाराचा जप करावा. ॐ नामाचा उच्चार पद्मासन, अर्धपद्मासन, सुखासन, वज्रासन करीत असतांनाही आपण करू शकतो. ॐ नामाचा जप केल्याने खालील फायदे आपल्या शरीराला मिळू शकतात….
१) अनेक वेळा ॐ अक्षराचा जप केल्याने पूर्ण शरीर तणावमुक्त होतं.
२) घाबरल्यासारखे वाटणे किंवा बेचैनी यांवर ॐ अक्षराचा जप करणे सर्वांत उत्तम उपाय आहे.
३) ॐ अक्षराचा जप केल्याने शरीरातील नकारात्मक तत्व दूर होतात तसेच तणावाच्या परिस्थितीत उत्पन्न होणाऱ्या द्रव्यांवरदेखील नियंत्रण ठेवले जाते.
४) ॐ अक्षराचा जप केल्यास हृदय आणि रक्ताभिसरण संतुलित राहते.
५) ॐ अक्षराचा जप केल्यास पचनशक्ती सुधारते.
६) ॐ अक्षराचा जप केल्याने शरीरात तरुणावस्थेतील उत्साह पुन्हा परत येतो.
७) थकव्यापासून बचावासाठी ॐ अक्षराचा जप करण्याव्यतिरिक्त दुसरा चांगला उपाय नाही.
८) ॐ अक्षराचा जप केल्याने झोप न येण्याच्या समस्येपासून त्वरित सुटका मिळते. रात्री झोपतांना झोप येईपर्यंत ॐ अक्षराचा जप केल्यास झोप येणे निश्चित आहे.
९) प्राणायाम करण्याच्या काही विशेष पद्धतींमध्ये ॐ अक्षराचा जप केल्यास फुफ्फुसांमध्ये मजबुती येते.
१०) ॐ च्या पहिल्या शब्दाचा उच्चार केल्यास शरीरात कंपन तयार होते. ह्या कंपनाने पाठीचा कणा प्रभावित होऊन त्याची क्षमता वाढते.
ॐ च्या दुसऱ्या शब्दाचा उच्चार केल्यास गळ्यात कंपन तयार होते. हे कंपन थायरॉईड ग्रंथीवर प्रभाव टाकते.